BIG BREKING बुलडाणा लाइव्ह ने म्हटल होत" कूछ तो गडबड हैं"! संशय खरा निघाला! तिघा मायलेकांनी पाडला बापाचा मुडदा; पोलिसांना उल्लू बनवायचा प्रयत्न करत होते;
मात्र पोलिसांनी सत्य शोधलेच, बातमीत वाचा खुनाचे कारण! रायपूरची खळबळजनक घटना

३० ऑक्टोबरच्या रात्री एकनाथ फोलाने यांचा राहत्या घरात मृत्यू झाला होता. त्याच रात्री त्यांची शेतातील ५ एकर सोयाबीन सुडी पेटली होती. दरम्यान गावातील लोकांमध्ये या प्रकाराबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. पोलिसांना सुद्धा हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने रायपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी बऱ्याच बाबी स्पष्ट होतील असे ठाणेदार राजरत्न आठवले "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना त्यावेळी सांगितले होते.
दरम्यान आज, ४ नोव्हेंबरला प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात एकनाथ फोलाने यांचा मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता त्यांनी मारहाण केल्याची कबुली दिली.
दारू प्यायला पैसे दिले नव्हते म्हणून..
दरम्यान ३० ऑक्टोबरला मृतक एकनाथ फोलाने यांना मुलांनी व पत्नीने दारू प्यायला पैसे दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी दारूच्या नशेत स्वतःच्या शेतातील ५ एकरातील सोयाबीनची सुडी पेटवून दिली होती. त्यांनी स्वतःच कुटुंबीयांना तशी माहिती दिली होती. पाच एकरातील सुडीची राखरांगोळी झाल्याने त्यांचा मोठा मुलगा राजू याने वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकनाथ फोलाने यांचा मृत्यू झाला असे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांना उल्लू बनवायचा प्रयत्न..!
दरम्यान रायपूर पोलिसांनी याप्रकरणी स्वतःहून पुढाकार घेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. घटनेनंतर जेव्हा कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली तेव्हा "आमचे वडील आजारी होते, आजारातच त्यांचा मृत्यू झाला" असे सांगून त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र साक्षीदार आणि उत्तरीय तपासणीचा अहवाल यातून सत्य समोर आलेच. पोलिसांनी याप्रकरणी एकनाथ फोलाने यांचा मोठा मुलगा राजू फोलाने (२१) पत्नी सुभद्राबई फोलाने (४३) व लहान मुलगा गणेश उर्फ विजय फोलाने (१८) तिघांना ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ठाणेदार राजरत्न आठवले करीत आहेत.