BIG BREKING माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गाडीला एस. टी. बसची धडक! पक्षाच्या बैठकीसाठी अमरावतीला जात होते;बोथा घाटातील घटना..

 
maji
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या वाहनाला एस. टी. बसने धडक दिली. आज, २ नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास बुलडाणा खामगाव मार्गावरील बोथा घाटात ही घटना घडली.

 माजी आमदार चैनसुख संचेती हे आज, सकाळी बुलडाणा येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मंडपांना भेटी दिल्यानंतर ते अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित पक्षाच्या बैठकीला जात होते. दरम्यान बुलडाणा खामगाव मार्गावरील बोथा घाटातील एका वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस संचेती यांच्या वाहनाला धडकली.

मात्र त्याचवेळी संचेती यांच्या इनोव्हा क्रिस्टा कारचे चालक निलेश राजपूत यांनी प्रसंगावधान राखल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली. या अपघातात संचेती यांच्या वाहनाचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. माजी आमदार संचेती ,त्यांचा पुतण्या आणि चालक तिघेही सुखरूप आहेत. "बुलडाणा लाइव्ह" ने माजी आमदार संचेती यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या चालकाने प्रसंगावधान राखल्याने सुखरूप असल्याचे ते म्हणाले. पुढील बैठकीसाठी श्री. संचेती अमरावती कडे रवाना झाले आहेत.