BIG BREKING सोन्याच्या लालसेपोटी ९ लाखांना गंडा! पोलीसदादा सांगून - सांगून कंटाळले तरीही लोकांची हाव सुटेना! वाचा अन् तुम्हीही सावध व्हा.! खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटना..

 
son
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोलीसदादांनी अनेकांना आवाहन करून, वृत्तपत्रांनी अनेक वेळा बातम्या देऊनही लोकांची सोन्याच्या गिन्या घेण्याची लालसा काही सुटतांना दिसत नाही. मग काय पुन्हा एकाने ९ लाख गमावले.  मुंबई येथील एका  बसचालकाची जळका तेली शिवारात ९ लाखाने फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 मुंबई येथील बसचालक संदेश गोविंद उनवरकर  (३६)  यांची मुंबईत एकाशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यांचे नेहमी मोबाईलवर बोलणे होत होते . उनवकर यांना कमी पैशात सोन्याच्या गिन्या देण्याचे आमिष त्याने दिले होते. त्यांच्यात बोलणी झाल्यानंतर संदेश उनवरकर हे आपल्या दोन मित्रांना सोबत घेवून २३ सप्टेंबरला १० वाजताच्या सुमारास खामगाव पासून जवळच असलेल्या जळका तेली येथे आले होते.

ठरल्याप्रमाणे ते ९ लाख रुपये घेवून एका शेतात गेले . तिथे आलेल्या तिघांनी नकली गिन्न्या देवून उनवरकर यांच्या जवळील ९ लाख रुपये घेतले. उनवरकर हे गिन्या तपासून पाहत असताना  त्यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांना तिघांनी एका झाडाला बांधून ठेवून ते तिघे निघून गेले. त्यानंतर काही वेळाने उनवरकर यांनी मित्राच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेतली. घाबरलेल्या अवस्थेत ते पुन्हा मुंबईला निघून गेले होते. दरम्यान आज त्यांनी आज दिनांक २ नोव्हेंबर याबाबत खामगाव  येथील ग्रामीण पोस्टेला येवून तक्रार दिली आहे.वृत्त लिहे पर्यत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.