BIG BREAKING! बुलडाण्याच्या भारत विद्यालयाचा मुख्याध्यापक निघाला लाचखोर; ११ वीत प्रवेश देण्यासाठी मागितले १५ हजार! १० हजार घेतांना रंगेहाथ पकडला !

पापात आणखी ३ भागीदार! लाख रुपयांचा पगार असताना खायची हाव सुटेना !!

 
jjkb
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या  भारत विद्यालयाच्या नावलौकिकाला काळीमा फासण्याचे काम शाळेच्या मुख्याध्यापकाने केलेय. अंशतः अनुदानीत यादीनुसार भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुलडाणा येथे ११ व्या वर्गात विज्ञान शाखेत प्रवेश देण्यासाठी लाचखोर मुख्याध्यापकाने    विद्यार्थ्यांच्या वडिलांना १५  हजार रुपयांची लाच मागितली. आज, ३ ऑगस्ट रोजी लाचखोर मुख्याध्यापकाच्या वतीने १० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना खामगाव रोडवरील  लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रन इन नीड या संस्थेच्या लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. प्रल्हाद धोंडू गायकवाड (५३, रा, महाराणा प्रताप नगर, सुंदरखेड) असे या भ्रष्ट लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. या कारवाईमुळे बुलडाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

बुलडाणा शहरातील वावरे ले आऊट मध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय पुरुषाने याप्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या मुलाला अंशतः अनुदानीत यादीनुसार भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र लाचखोर मुख्याध्यापक गायकवाड याच्या वतीने दि युथ लीग रिक्रिएशन सेंटर बुलडाणा येथील खासगी कर्मचारी गजानन सुखदेव मोरे(३८, रा. बिरसिंगपूर, ता. बुलडाणा) याने तक्रारदाराला १५ हजार रुपयांची लाच मागितली.दि युथ लीग रिक्रिएशन सेंटर बुलडाणा येथील आणखी एक  खासगी कर्मचारी जितेंद्र प्रल्हाद हिवाळे(३६, रा. नांद्राकोळी)  यानेदेखील लाच देण्यासाठी तक्रारदाराला प्रवृत्त केले.

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २८ जुलै रोजी एसीबी ने या तक्रारीची पडताळणी केली असता एसीबी ने पाठविलेल्या पंचांसमक्ष लाचखोर मुख्याध्यापक गायकवाड याने १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी देखील गायकवाड ने दाखवली. 
  
दरम्यान आज, ३ ऑगस्ट रोजी एसीबी पथकाने साफळा रचला असता लव ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड या संस्थेचा खाजगी कर्मचारी  राहुल विष्णू जाधव (३७, रा. देऊळघाट , ता. बुलडाणा) याने लाचखोर मुख्याध्यापक गायकवाडच्या वतीने १० हजार रुपये स्वीकारले. एसीबी पथकाने लगेच झडप घालून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान मुख्याध्यापकाच्या या  पापात भागीदार असलेल्या इतर तिघांनाही अटक करण्यात आली असून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाख रुपये पगार असताना देखील पैसे खाण्याची हाव सुटत नसल्याची चर्चा आता बुलडाणा शहरात सुरू आहे. गुरुजींच लाचखोर निघाल्याने ते विद्यार्थ्यांना काय शिकवतील असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जाणार आहे.

 ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन इंगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भांगे, पोहेकॉ विलास साखरे, राजू क्षीरसागर, मो. रिजवान, विनोद लोखंडे, जगदीश पवार, अ. काझी, स्वाती वाणी यांनी केली.