खामगाव बस स्टँडवर टुकार पोरांची हिम्मत वाढली; बस मध्ये चढणाऱ्या मुलीचा हात धरून म्हणाला, उतर खाली, मला काम आहे तुझ्याशी...

 
kraim
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून टुकार पोरांच्या करामती वाढल्या आहेत. खेड्यावरून शहरात शिकायला येणाऱ्या मुलींवर अशा पोरांची वाईट नजर असते. खामगाव बसस्थानकावर तर हे लफडेबाज पोट्टे बसूनच असतात. २ डिसेंबरच्या संध्याकाळी अशाच एका लफडेबहाद्दराने एसटी बस मध्ये बसणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला. मुलीने शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत तरुणी खामगाव बस स्थानकावर संध्याकाळी सव्वापाचला बस ची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी पुरुषोत्तम उर्फ बाल्या रामकृष्ण कावसकार (२५, रा. उमरा,ता.खामगाव) हा बस स्थानकावर आला. तो वेगवेगळ्या नंबर वरून त्या मुलीला फोन करीत होता. ती फोन घेण्यास टाळाटाळ करीत होती. त्यामुळे बाल्या ने वाईट उद्देशाने तिचा हात धरला, तिने कसाबसा त्याच्या तावडीतून हात सोडवला व ती बस मध्ये जाऊन बसली. बाल्या ने बस मध्ये चढून पुन्हा तिचा हात धरला, खाली उतर मला तुझ्याशी थोड काम आहे असे तो तिला म्हणाला  असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तपास पोहेकॉ  गजानन जोशी करीत आहे.