अशोक लांडे बुलडाणाचे नवे एलसीबी प्रमुख; गुन्हेगारांची आता खैर नाही! कर्तव्यपूर्तीची ग्वाही!

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत आस्थापना मंडळाची आज बैठक घेण्यात आली. बुलडाणा पोलीस दलाच्या आस्थापना बैठकीतील निर्णयानुसार,पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी चिखली येथील पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकारी पदी पदस्थापना दिली आहे. अशोक लांडे हे क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात माहीर आहेत. त्यांनी ऑगस्ट २०१८ ते २०२१ पर्यंत अमरावती शहरात वाहतूक विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांनी चिखली येथे ठाणेदार म्हणून दमदार कामगिरी केली आहे.
विविध गुन्ह्यातून आरोपींना अटक करून अनेक गुन्हे उघडकीस आणणाऱ्या अशोक लांडे यांना तत्पूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी कामगिरीबद्दल प्रशस्तपत्र बहाल करून गौरव केला आहे. त्यांच्या चिकित्सक वृत्तीमुळे गुन्ह्यांचा छडा लागतो हे जिल्ह्यातील गुन्हेगारांना कळून चुकले आहे. त्यांची बुलडाण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी बदली झाल्याने गुन्हेगारांचे धाबे आणखीच दणाणले आहेत. पोलीस दलातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कायदा व सुव्यवस्था तर राखतोच परंतु गुन्हेगारांनी अवैध धंदे सोडावे अन्यथा त्यांची खैर नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. दरम्यान याआधी एलसीबी प्रमुख म्हणून आपल्या कर्तव्याची विशेष छाप सोडणारे बळीराम गीते आता मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळणार आहेत. मात्र आतापर्यंत बोराखेडी पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळणारे राजेंद्र पाटील यांच्याकडे काय? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही.