तुम्ही ग्रुप ॲडमीन आहात? मग सायबर पोलीस काय सांगतात ते एकदा वाचाच..

 
kraim
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात भोंग्यावरून राजकारण पेटलेले असल्याने पोलीस  सतर्कता बाळगून आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्याविरुद्ध आज, ३ मेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीसांना अलर्ट राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. दरम्यान सायबर पोलीसांनी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांना सुद्धा सूचना केल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करतांना सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. व्हॉटस् ॲप गृपवृर कुणी तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करीत असेल तर ग्रुप ॲडमिन ने तात्काळ त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व पोलीसांना सूचना द्यावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

 कोणत्याही समूहाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट, ऑडियो क्लिप, व्हिडिओ क्लिप, मिम्स, मॅसेज सोशल मीडियावर प्रसारित करू नये. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांच्या सोशल मीडिया खात्यावर लक्ष ठेवावे. अनावधाने आपल्या पाल्यांकडून  चुकीच्या पोस्ट शेअर होत नाहीत ना याची खात्री करावी असे आवाहनही पोलीसांनी केले आहे. सामाजिक भावना दुखावल्या जाणारे मॅसेज ग्रुपवर पोस्ट होत असतील तर ग्रुप ॲडमिन सह पोस्ट करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.