मोताळा तालुक्यातील अंत्री शिवारात बिबट्याचा धुमाकूळ! बैल खाल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..

 
chitta
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मोताळा तालुक्यातील अंत्री शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. १२ नोव्हेंबरच्या रात्री बिबट्याने एका बैलाची शिकार केली आहे. त्यानंतर सुद्धा त्याच परिसरात बिबट्या बिबट्या दिसला आहे.

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची पेरणी व ओलीतीची कामे सुरू आहेत. दरम्यान अंत्री देशमुख येथील शेतकरी राजेंद्र जवरे यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या बैलावर १२ नोव्हेंबरच्या रात्री हल्ला चढवला. या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी जनावरांचा चारा पाणी करण्यासाठी गेल्यानंतर राजेंद्र पवार यांच्या लक्षात ही बाब आली. दरम्यान १३ नोव्हेंबरच्या रात्री काही शेतकऱ्यांनी जागून पहारा दिला असता त्या रात्री सुद्धा बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.