नववर्षात रस्ते अपघातात आणखी एक बळी! मारुती कारने दुचाकी स्वाराराला उडविले

 
ttrgf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  नववर्षातही अपघातांची श्रुंखला कायम आहे. लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील  मोटरसायकल अपघातात एक ठार झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात शेगाव -पंढरपूर महामार्गावरील वडगाव तेजन  शारा रस्त्यावर झालाय. मारुती कारने दुचाकीस्वाराला जोरदार आज दुपारी २ वाजता धडक दिली.या अपघातात विष्णू तुकाराम सवडतकर रा. वडगाव तेजन ( ५५ ) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या वर्षात अपघातांचा आकडा धक्कादायक आहे. हा आकडा कमी होईल असे वाटत असताना नववर्षाची चाहूल लागली. नवीन वर्षात देखील अपघातांची मालिका सुरूच आहे. आज शेगाव -पंढरपूर महामार्गावर वडगाव तेजन विष्णू तुकाराम सवडतकर हे आपल्या एम एच २८-७१०१ क्रमांकाच्या दुचाकीने शेतामध्ये जात होते.

दरम्यान अकोला येथील गणेश माताप्रसाद विश्वकर्मा हे  आपल्या मालकीच्या एम एच ३०-१८१ क्रमांकाच्या मारुती कारने लोणारकडे जात होते. दरम्यान दुचाकीला मारुती कारने जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात विष्णू सवडतकर यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती.त्यांना उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आले होते परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मेहकर नंतर त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर कारचालकाने पळ काढला होता.परंतु गावकऱ्यांच्या  सतर्कमुळे ही कार सुलतानपूर येथील पोलीस चौकीसमोर पकडण्यात आली.