आणखी एक आत्महत्या! वयाच्या २१ व्या वर्षीच घेतला टोकाचा निर्णय; मोताळा तालुक्यातील वाघजाळची घटना

 
kraim
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात हल्ली आत्महत्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. नापिकिने त्रस्त झालेले शेतकरी, बेरोजगारीला कंटाळले तरुण तर काही घटनांत कौटुंबिक वाद किंवा प्रेमप्रकरण आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत. मोताळा तालुक्यातील वाघजाळ येथील २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. यादव राजू सोळंके (२१) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

 वाघजाळ गावशिवाराला लागून असलेल्या गजानन उबाळे यांच्या शेतातील निबांच्या झाडाला यादव ने गळफास घेतला. या प्रकरणाची तक्रार यादवचा मोठा भाऊ मुरलीधर ने बोराखेडी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. बोराखेडी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून यादव ने एवढ्या कमी वयात आत्महत्या का केली याचे कारण मात्र समोर येऊ शकले नाही.