जिल्ह्यात एका दिवसात चौघींनी सोडले घर! कारण...त्यांचे त्यांनाच माहीत! पालक हवालदिल! त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता? वाचा..

 
kln
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात १ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत ५५ जण बेपत्ता झालेत. त्यात २९ मुली तर २६ पुरुषांचा समावेश आहे. ५५ पैकी ३९ जण १८ ते ३० वयोगटातील आहेत. बेपत्ता होणाऱ्यामध्ये अविवाहित तरुणी, विवाहीत महिला तरुण आणि विवाहित पुरुषांचा देखील समावेश  आहे. दरम्यान काल, २१ सप्टेंबर रोजी चौघिंनी घर सोडले. त्यात तीन तरुणी व एका विवाहितेचा समावेश आहे.

खामगाव तालुक्यातील शिरजगावं देशमुख (ता. खामगाव) येथून कु.नेहा कैलास खंडेराव(१९) ही बेपत्ता झाली आहे. आईवडिलांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथून कु.अनुराधा विष्णू सरकटे ही १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील नसीराबाद येथून  मनीषा कृष्णा राठोड(१८) बेपत्ता झाल्याची नोंद सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यातील हतेडी बु येथून कु.कोमल पुरुषोत्तम जेठे ही  तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. फोटोत दिसणाऱ्या तरुणी कुठे दिसल्यास आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात कळविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.