आगलाव्याला रंगेहाथ पकडले!; संग्रामपूर तालुक्यात वनविभागाची कारवाई
Sat, 7 May 2022

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जंगलाला विनाकारण आग लावणाऱ्या आगलाव्याला वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आज, ७ मे रोजी संग्रामपूर तालुक्यातील भेंडवळ बीट मध्ये ही कारवाई करण्यात आली.
रामदास देवचंद सैरीशे (५४, रा.पेसोडा, ता. संग्रामपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वनविभागाच्या भेंडवळ बीट मध्ये त्याने जंगलाला अंगार लावल्याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाव घेतली असता आरोपी रंगेहाथ पकडला. जंगलाला आग लावणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. कुणी तसे करत असल्याचं वनविभागाला याची माहिती देण्यात यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. कटारीया व त्यांच्या पथकाने केली.