जिल्ह्यात आगलावे वाढले..! गोठ्याला लावली आग; तीन लाखांचे नुकसान! सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 
dfgh
सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात यंदा आग लागण्याच्या आणि आग लावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव येथे गोठ्याला आग लावल्याने  जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. काल, ७ मार्चच्या रात्री ही घटना घडली. 
खैरव येथील शेतकरी मधुकर गबाजी तळेकर यांच्या शेतातील गोठ्याला काल रात्री ७ च्या सुमारास अचानक आग लागली. ही लाग कुणीतरी विकृत व्यक्तीने लावल्याचे तळेकर यांचे म्हणणे आहे. या आगीत गोठ्यातील टिन पत्रे, सोयाबीन, तूर व हरभऱ्याचे कुटार, जनावरांचा चारा, पेट्रोल पंप, स्प्रिंकलर पाईप, ठिबक व इतर शेती अवजारे असे २ लाख ९८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठ्यांनी आज, ७ मे रोजी केलेल्या  पंचनाम्यात म्हटले आहे. तसा अहवाल तहसीलदारांना पाठविण्यात आला आहे.