गणपतीच्या मिरवणुकीनंतर गोठ्यात जाऊन गळफास घेतला बेरोजगारीला वैतागला होता तरुण; बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील घटना

 
fvty
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बेरोजगारीला कंटाळून २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल , रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे ही घटना घडली. दिपक गंजीधर सोनवणे (२२, रा. रुईखेड मायंबा, ता. बुलडाणा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

 प्राप्त माहितीनुसार दीपक मुकबधीर होता. मात्र आईवडिलांना तो कामात पूर्ण मदत करायचा. आठ ते दहा गाईंचा दुग्धव्यवसाय तो स्वतः सांभाळायचा. मात्र काल, त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक.. सायंकाळी तो गावातील गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. मात्र रात्री  मिरवणुकीतून परतल्यानंतर त्याने गुरांच्या गोठ्यात जाऊन गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.