वासनेची भुक भागल्यावर लागली पैशांची भुक! "ते" फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १ लाख! खामगाव तालुक्यातील घटना

 
redfv
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विवाहितेसोबत त्याने आधी अनैतिक संबंध ठेवले. त्या खासगी  क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो काढले आणि नंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून १ लाख रुपये उकळले. एवढ्यावर त्याची भूक भागली नाही त्याने आणखी ५० हजार मागितले. मात्र तिची परिस्थिती नसल्याने त्रस्त होते पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .

प्राप्त माहितीनुसार खामगाव तालुक्यातील एका गावातील विवाहितेचे संशयित मंगेश लक्ष्मण लांडगे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्या वेळी त्या संबंधांचा फायदा उठवत मंगेश ने दोघांच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण केले. नंतर मंगेश विवाहितेला सतत ब्लॅकमेल करू लागला. बदनामीच्या भीतीपोटी तिने कसेबसे १ लाख रुपये त्याला दिले.  मात्र एवढ्यावर त्याची भुक भागली नाही. त्याने आणखी ५० हजार रुपये तिला मागितले. मात्र तिची परिस्थिती नसल्याने तिने नकार दिला आणि थेट खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी  मंगेश विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.