बातमी वाचून तळपायाची आग मस्तकात जाईन! ७० वर्षाच्या नराधमाचा ९ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार! मुलीच्या आईने म्हाताऱ्याला रंगेहाथ पकडले! खामगाव तालुक्यातील अटाळीची घटना

 
jhkb
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खामगाव तालुक्यातील अटाळी येथून संतापजनक बातमी समोर आली आहे. ७० वर्षाच्या नराधम म्हाताऱ्याने अंगणात खेळणाऱ्या मुलीला घरात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काल, ३ ऑक्टोबरच्या दुपारी ही घटना घडली. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रात्री १० वाजता आंबेटाकळी येथून अटक करण्यात आली आहे.

रामकृष्ण गवई (७०) असे या नराधम थेरड्याचे नाव आहे. ९ वर्षाची चिमुकली मैत्रिणीसोबत खेळत होती. त्याचवेळी गल्लीत राहणाऱ्या गवई ने मुलीला त्याच्या घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान मुलीची आई मुलीला शोधत गवईच्या घरापर्यंत आली. गवईच्या घराचा दरवाजा लोटल्यावर गवई नग्न अवस्थेत दिसून आला. मुलीच्या आईला पाहताच गवई ने गावातून पळ काढला. 

मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून  तक्रार दिली. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदके यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपी म्हाताऱ्याला आंबेटाकळी येथून अटक केली.  पुढील तपास सुरू आहे.