चिखलीवरून खामगावकडे जाणाऱ्या एस.टी बसचा अपघात! ऑटोला वाचवण्याच्या नादात...
Updated: Oct 26, 2022, 19:23 IST

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अमरावती डेपोच्या बसचा चिखली खामगाव रोडवरील किन्ही फाट्याजवळ अपघात झाला. ऑटोला वाचविण्याच्या नादात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली. आज भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती आगाराची ही बस चिखली कडून खामगावच्या दिशेने जात होती. दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या व नियंत्रण सुटलेल्या एका ऑटोला वाचविण्याच्या नादात ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली. समोर असलेल्या एका पोलवर ही बस धडकली त्यामुळे बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात बसमधील १०ते १२ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खामगावला हलविण्यात आले आहे.