गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या! मोताळा तालुक्यातील घटना

 
dhamangav
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गळफास घेऊन ३३ वर्षीय  तरुणाने आत्महत्या केली.मोताळा तालुक्यातील लालमाती शिवारात काल, १६ जुलै रोजी पहाटे ही घटना घडली.

bb

सुभाष प्रकाश गोरे (३३) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. १५ जुलै रोजी  कामाला जातो असे सांगून तो घरातून निघाला होतो. मात्र तो परत आलाच नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. सुभाषने लालमाती शिवारात एका झाडाला फाशी घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहेत.