धार्मिक भावना दुखावणारा व्हिडिओ केला व्हायरल! मोताळ्याच्या याकूब कुरेशी सह ६ जणांविरुद्ध गुन्हा

 
borakhedi

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  धार्मिक भावना दुखावणारा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोताळा येथील ६ जणांविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, ९ ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला.

      जाहिरात👇

jhavar
 मोताळा येथील ज्ञानेश्वर वाघ यांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे व्हिडिओ काढण्यात आले. त्यात व्हिडीओत मागील सहा महिन्याआधी निघालेल्या एका दुसऱ्या समाजाच्या मिरवणुकीचे व्हिडिओ मिक्स करून त्यात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आणि  दोन समाजात तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावणारे ते व्हिडिओ व्हायरल करण्यात आले.

अशा तक्रारीवरून याकूब कुरेशी, जुनेद शहा, शे.समीर, वसीम कुरेशी, अरबाज खान आणि समीर कुरेशी अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे आणि पोकॉ आकाश यादव हे करीत आहेत.