भरधाव दुचाकी रस्त्यात उभ्या ट्रकवर आदळली! आईवडिलांच्या एकुलत्या एका लेकासह महिला जागीच ठार! मेहकर फाट्यावरील घटना! तरुण भरोसा गावचा, महिला पिंप्री आंधळेची

 
sedtg
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  रस्त्यात बंद पडलेल्या ट्रकवर भरधाव दुचाकी आदळली. या अपघातात दुचाकीवरील तरुण व महिला जागीच ठार झाले. मेहकर फाट्यावर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रस्त्यात निष्काळजीपणे ट्रक उभ्या करणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात ठार झालेला तरुण आईवडिलांना एकुलता एक होता, तो भरोसा येथील राहणारा होता तर त्याची गाडीवर बसलेली महिला देऊळगावराजा तालुक्यातील पिंप्री आंधळे येथील राहणारी होते. दोघे चिखलीकडे जात होते.

विवेक समाधान जाधव(२०) व निर्जला साहेबराव परिहार  दोघे चिखलीकडे विनाक्रमांकाच्या मोटारसायकलने जात होते. मेहकर फाट्याजवळ एक ट्रक विना लाईट व इंडिकेटर न लावता रस्त्याच्या मधोमध उभा होता. रात्रीची वेळ असल्याने ट्रक विवेकला दिसला नाही. त्याची दुचाकी थेट ट्रकवर आदळल्याने विवेक जाधव आणि निर्जला परिहार यांचा जागीच मृत्यू झाला.