भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; एक ठार, एक गंभीर! मोताळा तालुक्यातील मूर्ती फाट्यावरील घटना

 
jhn
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भरधाव ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना बुलडाणा  मोताळा रस्त्यावरील मूर्ती फाट्यावर काल, ७ डिसेंबरच्या संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली.

मोताळा तालुक्यातील साखळी येथील संतोष रंगनाथ जोशी(३०) व त्यांच्यासोबत अन्य एक जण बुलडाणा येथून मोताळ्याकडे जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी दुचाकीवरील ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले तर संतोष जोशी यांच्यावर उपचार सुरू आहेत.