बंद पडलेल्या टिप्परवर मोटारसायकल धडकली! माजी सरपंचांचा जागीच मृत्यू! संतप्त जमावाने टिप्पर जाळले; पोलिसांवरही दगडफेक

 
fgcg
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रस्त्यात बंद पडलेल्या टिप्परला मोटारसायकल धडकल्याने मोटरसायलवरील भालेगाव ( ता.मेहकर) येथील माजी सरपंच जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाले. काल, २ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास मेहकर  जानेफळ रस्त्यावर समृध्दी महामार्गानजीक हा अपघात झाला.सुरेश विठोबा धोंडगे(४५, रा. भालेगाव,ता.मेहकर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

  प्राप्त माहितीनुसार भालेगाव(ता.मेहकर) चे माजी सरपंच सुरेश विठोबा धोंडगे व भगवान सुखदेव निकस(४२) दोघे मोहदरी येथे कामानिमित्त जात होते. दरम्यान मेहकर जानेफळ रस्त्यावर समृध्दी महामार्गाजवळ एक टिप्पर रस्त्यात बंद अवस्थेत उभे होते.टिप्पर चालकाने रेडियम किंवा पाठीमागे असलेले लाईट बंद ठेवलेले असल्याने धोंडगे यांना टिप्पर दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी टिप्पर वर धडकली. यात धोंडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर निकस गंभीर झाल्याने त्यांना संभाजीनगर येथे हलविण्यात आले.दरम्यान अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटवून दिले. मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जमावाने सुद्धा पोलिसांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. अखेर अग्निशामक दलाने टिप्पर विझवले. वृत्त लीहिस्तोवर याप्रकरणी तक्रार देण्यात आली नव्हती.