सोयाबीन काढतांना मळणी यंत्रात अडकून मजुराचा मृत्यू! मृतदेहाचा झाला चेंदामेंदा;खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

 
jhg
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन चे काड लोटत असताना मळणी यंत्रात अडकल्याने तरुण मजुराचा मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील पंप्री देशमुख शिवारात ही धक्कादायक घटनी घडली ज्ञानेश्वर दामोधर अढाव (२५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पिंप्री देशमुख येथील दिलीप भास्कर देशमुख यांच्या शेतात सोयाबीन काढण्याचे काम सुरू होते. रामेश्वर देशमुख यांच्या मळणी यंत्रावर ज्ञानेश्वर देशमुख हा काड लोटण्याचे काम करीत होता. काम सुरू असताना कडासहित त्याचा हात मळणी यंत्रात अडकला. काही क्षणात ज्ञानेश्वरचे पूर्ण शरीर मळणी यंत्रात ओढले गेले. यात त्याच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.