बुलडाण्यात घराला लागली आग; घरातील सगळ काही जळून खाक; ४ ते ५ लाखांचे नुकसान! उघड्या पडलेल्या संसारासाठी मदतीची हाक

 
yfhjyh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आग सर्व उध्वस्त करते. बुलडाणा तालुक्यातील सुंदरखेड मधील तार कॉलनी येथे जितेंद्र खिल्लारे यांच्या घराला आग लागून संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याचे कारण खिल्लारे यांनी सांगितले.  या घटनेत केवळ वित्तहानी झाली.

कोणते संकट कधी येईल हे सांगता येत नाही. तारकॉलनी येथे आगीच्या भक्षस्थानी घर सापडले. ही घटना घडल्यावर प्रशासकीय यंत्रणा तर वेळेवर आली मात्र, श्री. आडे दांपत्य व सोबत सेवानिवृत्त पोलीस आगळे त्यांनी प्रयत्न केले. भाजीपाला व्यवसायीक  सपकाळ सुद्धा धावून आले. अचानक निघत असलेला धूर बघता बघता त्या धुराचे झालेले आगीत रूपांतर हा नजारा थराला होता. परंतु प्रयत्नानंतरही जवळपास १०० टक्के संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची वस्तुस्थिती आहे.अश्या परिस्थिती मध्ये निलेश राठोड यांनी ५ हजारांची तत्काळ मदत दिली. शासन केव्हा देणार? हे येणारी वेळ सांगेल.