बुलडाणा जिल्ह्यातल्या "या" गावचा किराणा दुकानदार मोठा चावट; दुकानात गेलेल्या विवाहितेला म्हणे, माणसाला जसे जेवण आवश्यक तसे बाईला "ते" पाहिजेच! डोळा मारून तिला म्हणे, मला...

 
polis
जळगाव जामोद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील एक किराणा दुकानदार भलताच चावट निघाला. किराणा खरेदी करण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेचा दुकानदाराने विनयभंग केला. तिच्यावर डोळा मारला, तिच्याशी अश्लील विषयावर बोलू लागला. एवढेच काय दुकानदाराने चक्क तिला प्रपोज केले.  आज, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ही  घटना घडली असून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात चावट दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप राठी असे या दुकानदाराचे नाव आहे. विवाहितने दिलेल्या तक्रारीनुसार आज ,सकाळी ती दिलीप राठीच्या दुकानात किराणा आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी तू तुझ्या आईवडिलांसोबत का बोलत नाही असे दिलीप राठीने विवाहितेला विचारले. त्यावर "मी माझ्या दिरासोबत मोटारसायकलवर बसून शेतात जात असल्याने लोक मला त्याच्यासोबत पाप लावतात,त्यामुळे माझे आईवडील माझ्याशी बोलत नाही" असे विवाहितेने राठीला सांगितले.

त्यावर " ज्याप्रमाणे माणसाला जेवण आवश्यक असते त्याप्रमाणे बाईला "ते" आवश्यक असते असे राठी तिला म्हणाला. विवाहितने राठी याला नारळ मागितले ,राठीने नारळ दिल्यावर विवाहितेने मोठे नारळ द्या म्हटल्यावर  राठीने तिच्यावर डोळा मारला.

   तू मला खूप आवडते ,तू आत ये आणि वाटेल ते नारळ घे असे राठीने तिला म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माझे लग्न झालेले आहे, तुम्हाला असे म्हणणे शोभत नाही असे म्हणून विवाहिता दुकानातून घरी परतली. तिने घडला घटनाक्रम पतीला सांगितला,त्यानंतर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी करीत आहेत.