बायकोच्या चारित्र्यावर दारुडा नवरा संशय घ्यायचा; त्यालाच लागला दुसरीचा नांद! चिखली पोलीस ठाण्यात येऊन विवाहिता म्हणाली....

 
chikhlipolis

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दारू संसाराचा सत्यानाश करते हे शतप्रतिशत सत्य आहे. दारूच्या नशेत माणूस काय करतो याचे भानही त्याला राहत नाही. चिखली पोलीस ठाण्यात अश्याच दारुड्या नवऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पहिल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊन पहिली बायको असताना दारुड्या नवऱ्याने दुसरी बायको केल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. 

           जाहिरात👇

jhavar

विवाहिता सध्या माहेरी मकरध्वज खंडाळा येथे आली आहे. सन २००० मध्ये विवाहितेचे बुलडाणा तालुक्यातील सावळी येथील समाधान अवसरमोल याच्याशी लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस नवऱ्याने तिला चांगले वागवले मात्र २००६ नंतर नवऱ्याला दारूचे व्यसन लागल्यानंतर तो बिघडला असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर नवरा तिला मारहाण करायचा ,छोट्या छोट्या गोष्टी वरून वाद घालायचा. तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान नंतरच्या काळात नवरा समाधान ला दारूचा धंदा टाकायचा होता, त्यासाठी माहेरवरून २० हजार रुपये घेऊन ये असा तगादा तो तिच्याभोवती लावू लागला. पैसे आणले नाही तर तुला नांदवणार नाही असे म्हटल्याने ती फेब्रुवारी २०२२ पासून माहेरी मकरध्वज खंडाळा येथे राहते. दरम्यान नवरा समाधान अवसरमोल याने बुलडाणा तालुक्यातील रुईखेड येथील एका मुलीशी दुसरे लग्न केल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह  सासू व नणंद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.