दिव्यांग महिलेच्या घरात घुसून तोंड दाबून बलात्कार! मोताळा तालुक्यातील घटना! आरोपीला अटक

 
borakhedi
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  दिव्यांग महिलेच्या घरात तिच्यावर तोंड दाबून बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला बोराखेडी पोलिसांनी काल,बेड्या ठोकल्या. १६ सप्टेंबरला ही घटना घडली होती. त्यादिवसापासून आरोपी पोलिसांना झुलवत होता.

 प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील एका गावातील दिव्यांग महिला घरी एकटी होती. त्यावेळी रात्री साडेदहाच्या सुमारास निलेश नारखेडे याने घरात प्रवेश केला आणि तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग केला. 

 या घटनेनंतर १८ सप्टेंबर रोजी पीडित विवाहित महिलेने बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी निलेश नारखेडे विरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारी यांनी तपासाची चक्रे फिरवीत आरोपी निलेश नारखेडे याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.