वडीलांच्या डोक्यावर ९३ हजारांचे कर्ज! शेतकरी पुत्राने गळफास घेऊन सपवले जीवन; नांदुरा तालुक्यातील निमगावची घटना...!!

 
hjhhj
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ९३ हजार रुपयांच्या कर्जापाई तरुण शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आलाय . नांदुरा तालुक्यातील निमगाव मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. राजेश सुधाकर दांडगे(२९) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.

राजेश चे गावातीलच श्रीकांत देशमुख यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदुरा येथे पाठविण्यात आला. दरम्यान राजेशच्या वडिलांच्या नावावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निमगावचे ९३ हजार रुपयांचे कर्ज होते. सततची नापिकी मुळे कर्जही फेडता येत नव्हते. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. नांदुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.