विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार विजयराज शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल! विद्यार्थ्यांच्या वडिलांनी केली तक्रार..!!
Aug 4, 2022, 10:33 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आश्रमशाळेत खेळत असताना लोखंडी गेट अंगावर पडुन चिमुकल्या ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ जुलै रोजी घडली होती. दरम्यान याप्रकरणी मृतक विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या माजी आमदार विजयराज शिंदेयांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन रमेश दुबे (८, रा. नेमसेडी, जि. खंडवा) हा विद्यार्थी येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. १६ ऑगस्ट रोजी खेळता खेळता शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. रोशनचे आई वडील पुणे येथे मजुरी काम करीत होते. दरम्यान मुलाच्या मृत्यूला संस्थाचालक माजी आमदार विजयराज शिंदे यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक आणि चौकीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहेत.