मेहकरच्या वैतागवाडीतल्या १७ वर्षीय मुलीला "त्या" दोघांमुळे आलाय वैताग! पाटलाचा झटका दाखवतो म्हणत तिच्यासोबत वाईट केलं..! तिने घरी जाऊन फिनाईल केले प्राशन

 
kkkk
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर शहरातील वैतागवाडी परिसरातील १७ वर्षीय मुलगी कॉलेजला जात असताना दोघांनी तिला रस्त्यात अडवले. पाटलाचा झटका दाखवतो म्हणत तिची छेड काढली. त्यामुळे अपमान झाल्याची भावना झाल्याने मुलीने घरी येऊन फैनाईल औषध प्राशन केले त्यामुळे अत्यावस्थ अवस्थेत तिला रुग्णालयात भरती करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पिडीत मुलीच्या जबाबावरून मेहकर पोलिसांनी नात्याने साळे - मेव्हणे असणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 पिडीत मुलीने दिलेल्या जबाबानुसार ती ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता कॉलेजला जात होती. त्याच वेळी सुनील जंजाळ आणि त्याचा जावई विशाल लांडकर दोघांनी  मोटारसायकल वरून येत तिला अडवले. तुझा भाऊ माझ्या पोरीची छेडखानी करतो, माझ्या पोरीच्या मागे हिंडतो,  तुमची लायकी आहे  का अशी शिवीगाळ त्या दोघांनी पीडितेला केली. तुला पाटलाचा झटका दाखवतो असे म्हणत विशाल लांडकर याने मुलीचा हात ओढला तर सुनील जंजाळ याने तिचे केस ओढत तिच्या गालावर चापट मारली.  मुलीने आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. त्यावेळी तुला आणि तुझ्या भावाला जीवाने मारतो अशी धमकी देत दोघे निघून गेल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

 या प्रकारानंतर घाबरलेल्या मुलीने घडला प्रकार तिच्या आत्याला सांगितला, मात्र लेकीबाळीचा विषय असल्याने आपण आपसात मिटवून घेऊ अशी समजूत काढल्याने तक्रार दिली नाही. मात्र सकाळी घडलेला प्रकार तिच्या डोक्यातून जात नव्हता. अखेर वैतागून रात्री साडेआठला तिने फिनाईल प्राशन केले, तिला उलट्या होऊ लागल्याने तिच्या आत्याने दिला दवाखान्यात भरती केल्याचे पीडित मुलीने सांगितले. पिडीत मुलीच्या जबाबा वरून मेहकर पोलिसांनी सुनील जंजाळ आणि विशाल लांडकर या दोघांविरुद्ध विनयभांगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.