रेल्वेच्या धडकेने ४९ वर्षीय पुरुषाचा मृत्‍यू

नांदुरा तालुक्‍यातील घटना
 
नांदुरा रेल्वे स्‍टेशन
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील खुमगावजवळ लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत ४९ वर्षीय व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला. ही घटना आज, ११ नोव्हेंबर पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) घडली.
नंदकिशोर महादेव महाले (४९, रा. अमलपूर, ता. नांदुरा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. घटनेची माहिती लोहमार्ग पोलीस सुनील कवडकार, माजिद खान, ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकार यांनी मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नांदुरा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात हलविण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.