चिखलीच्या शेतकऱ्याची ४३ कट्टे सोयाबीन गेली चोरीला

 
अचानक वळलेल्या बसवर कार धडकली, कारमधील चौघे जखमी; चिखली तालुक्‍यातील दुर्घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथील शेतकऱ्याच्या शेतातील ४३ कट्टे सोयाबीन आणि ४ कट्टे उडीद चोरट्यांनी चोरून नेले. काल, २२ डिसेंबर रोजी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तुषार सुरेशचंद्र लोखंडे (४३, रा. वाॅर्ड क्रमांक २१, चिखली) हे त्यांच्या काकाची वळती रोडवरील पळसखेड जयंती शिवारातील शेती सांभाळतात. शेतातील गोडाऊनमध्ये ४३ कट्टे सोयाबीन आणि ४ कट्टे उडीद त्यांनी साठवून ठेवले होते. २१ डिसेंबर रोजी शेतात गेल्यावर त्यांना गोडाऊनमध्ये ठेवलेला शेतमाल दिसला नाही. आजूबाजूला पाहणी केली असता त्यांना टायरची चिन्हे आढळली. चोरट्यांनी शेतातील सोयाबीन आणि उडीद असा ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.