झाडाला गळफास लावून ४० वर्षीय इसमाची आत्महत्या! मोताळा तालुक्यातील तरोडा येथील घटना..

 
मोताळा
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मोताळा तालुक्यातील तरोडा येथील एका ४० वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल २३ जून, रविवार रोजी दुपारी घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 
   रामनाथ जोरसिंग जाधव(४० वर्ष) असे मृतकाचे नाव असून ते तरोडा येथील रहिवासी आहे. रविवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास गावातील सरकारी विहिरीजवळील निंबाच्या झाडाला त्यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती गावातीलच मुरलीधर मेल्हडे यांनी बोराखेडी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास एएसआय यशवंत किसन तायडे हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण तरोडा गावात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.