३५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; मोताळा शहरातील घटना

 
suside
मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ३५ वर्षीय विवाहित युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोताळा शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये ही आज, २८ एप्रिलला दुपारी  साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
मंगेश शंकर मानकर ( ३५, रा. मोताळा) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. मंगेशची पत्नी मुलीला सोडायला मोताळा येथील बसस्टँडवर गेली होती. त्याच वेळी घरी एकट्या असलेल्या मंगेशने ओढणीच्या सहाय्याने टिनाखालील अँगलला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. तपास बोराखेडी पोलीस करत आहेत.