काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ३४ क्विंटल तांदुळ पकडला!चौघांविरूध्द गुन्हा, खामगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई..!!!!

 
khamgao
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रेशनचा तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी एका वाहनाद्वारे जात असल्याची गुप्त माहिती खामगाव ग्रामिण पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचुन पोलिसांनी २ डिसेंबरच्या  रात्री १०.३० वाजताच्या सुमारास खामगाव तालुक्यातील वहाळा खु  येथे नाकाबंदी केली. त्यावेळी बोरी -अडगाव येथुन महिंद्रा बोलोरो पिकअप क्र. एमएच २८ एमी ३५०५ हे वाहन येतांना दिसले. ते वाहन थांबवुन पोलिसांनी झडती घेतली यावेळी रेशनचा ३४ क्विंटल तांदुळ (किं. ४० हजार ८०० रु.) मिळाला. पोलिसांनी तांदुळ, वाहन (किं. ३ लाख रु.) द मोबाईल (कि.५ हजार रु.) असा एकुण ३ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी एएसआय सुनिल देव यांनी खामगाव  ग्रामिण पोलिसात तशी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून तहसीन खान मोती खान (२३), फिरोज खान आजम खान (५०), इस्माईल खान रउल्ला खान (३८, तिघेही रा. शिरपुर खेड़ी ता. पातूर जि. अकोला) व आणखी एका अज्ञाताविरोधात अशा ऐकून चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय निलेश लबडे करीत आहेत.