३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या! दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न! मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना!

 
fcbgvd
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील तालखेड येथील ३० वर्षीय तरुणाने महाल पिंप्री शिवारातील शेतात गळफास घेतल्याची घटना काल, २९ मे रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून  बोराखेडी पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोताळा तालुक्यातील तालखेड येथील विवेक जोशी या तरुणाचे दोन महिन्याआधी लग्न झाले होते. त्याची महालपिंप्री शिवारात गट क्र. ३९ मध्ये शेती आहे. काल, २९ मे रोजी त्याने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रल्हाद वानखेडे व पोकॉ गजानन इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. बोराखेडी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद वानखेडे हे करीत आहे.