सिंदखेडराजात भीषण अपघात 'ट्रॅव्हल्स' उलटून ३० प्रवासी जखमी!

 
  Sbb
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नागपूर कडे भरधाव वेगाने जाणारी खाजगी प्रवासी बस उलटल्याने झालेल्या अपघातात किमान तीस प्रवासी जखमी झाले .यांतील ८ गंभीर जखमी प्रवाश्यांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
 या अपघाताचा विस्तृत तपशील मिळाला नाही. प्राप्त माहितीनुसार ,जुन्या मुंबई नागपूर मार्गावर किनगाव राजा (तालुका सिंदखेडराजा , जिल्हा बुलढाणा) परिसरात आज शुक्रवारी ही दुर्घटना घडली. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे समजते. पुण्याहून नागपूर कडे जाणाऱ्या ( ए आर ०६ ए ९७४१ क्रमाकाच्या )
चिंतामणी ट्रॅव्हल्स बसला आज हा अपघात झाला. 
चालकाच नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला उलटली.अपघातात तीस प्रवासी जखमी झाले असून त्यातील आठ प्रवाश्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पोलिसांनी जालना येथे उपचारासाठी हलविले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अपघातातील उर्वरित बावीस जखमींवर सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नाही आणि काही प्रवासी जखमी होण्यावर निभावले असली यावेळी मोठी दुर्घटना टळल्याचे वृत्त आहे.
एक तास अडकले प्रवासी
 ट्रॅव्हल्स बस डाव्या बाजूने उलटल्याने प्रवाशी किमान एक तास अपघातग्रस्त बसमध्ये अडकून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसला मागील बाजूला असणारे संकट कालीन दार (मार्ग)नसल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. 
समृद्धी महामार्गावर झालेल्या जळीत खाजगी बसच्या अपघाताची पुनरावृत्ती गावकऱ्यांच्या सतर्कतेने टळली.