एकाच कॉलेज मध्ये शिकणारे ३ तरुण अन् १ तरुणी अचानक झाले गायब..! ६ दिवस उलटले सापडले नाहीत! फोटो बघा अन् कुठे दिसले तर पोलिसांना सांगा..!!

 
gggg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकाच कॉलेज मध्ये शिकणारे ३ तरुण आणि १ तरुणी एक ऑगस्ट पासून बेपत्ता आहे. १ ऑगस्टला चौघेही आपापल्या घरून कॉलेजला गेले मात्र तेव्हापासून ते परतलेच नाहीत. चौघेही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या व्याळा येथील पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये शिकत होते. बेपत्ता झालेल्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाचा देखील समावेश आहे.

अकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळशी अनिल ताले (१८, रा रेणुका नगर डबकी रोड चिखली), प्रतीक मनोहर तायडे(२१, रा अडगाव बू,ता. तेल्हारा, जि. अकोला), हर्ष विष्णू घाटोळ (१७, रा.पळशी खुर्द, खामगाव) व प्रफुल्ल पांडुरंग लंगोटे (१९, रा.न्यू भीम नगर, कृषी नगर अकोला) असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. चौघेही व्याळा येथील मानव सुटी पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये शिकत होते.

१ ऑगस्टला चौघेही कॉलेजमध्ये गेले मात्र ते परतले नाहीत. चौघेही एकत्रच बेपत्ता झाल्याने वेगवेगळ्या शंकाकुशकांना उत आलाय. बाळापूर पोलीस स्टेशन, सिव्हिल लाइन्स अकोला पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा अकोला या प्रकरणाचा तपास करीत आहेत. बातमीत असलेल्या फोटोतील मुलांना कुठे बघितल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 संपर्क: मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अकोला एलसीबी  7020821785