२९ वर्षाचा लखन..! जिवाला कंटाळला अन् रेल्वेखाली येऊन...

 
Lakhan
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शालिमार एक्सप्रेस खाली येऊन २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक ८ मेच्या सकाळी ८ वाजता दरम्यान घडली.
शलीमार एक्सप्रेस (१८०२९) खाली कि.मी. ५२०/५२२ दरम्यान एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे गँगमन श्याम बाबूलाल इंगळे यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचा भाऊ आकाश भगवान गोहर रा. शिवाजी हायस्कूल जवळ, नांदुरा हा देखील घटनास्थळी पोहोचला. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव लखन भगवान गोहर (वय २९ वर्षे) असून तो आपला भाऊ असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुनिल कवाळकर हे करीत आहेत. लखनने आत्महत्या का केली?, याचे कारण मात्र समजू शकले नाही.