२६ वर्षीय विवाहितेची गळफास घेवुन आत्महत्या ! पैशासासाठी सासरचे छळत होते; पोलीस संरक्षणात अंतिम संस्कार! पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल! मलकापूर तालुक्यातील घटना!

 
fdhbgf
मलकापुर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मलकापूर शहर पो.स्टे अंतर्गत  येणाऱ्या वाघुळ येथिल ज्योती गजानन सनिसे (२६) हीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती गजानन दशरथ सनिसे, सासु इंद्रायणी दशरथ सनिसे,सासरे दशरथ सनिसे , जेठ दीपक सनिसे,जेठाणी नंदा राजु सनिसे,सविता दीपक सनिसे  सर्व (रा. वाघुळ) तर  ननंद ज्योति विलास वावगे( रा. वरणा ता. खामगांव ) यांनी अमानवी त्रास दिल्याने तिने गळफास घेतल्याचे मृतक विवाहितेच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. 

तक्रारी नुसार ज्योती हीचा विवाह १९ मे २०१७ रोजी वाघुळ येथिल गजानन दशरथ सनिसे याचेशी झाला होता. लग्नात वधुपित्या कडुन भेटवस्तु दागीने व ४० हजार रु. हुंड्यापायी दिले होते.  सुखी संसाराच्या वेलीवर कु.जान्हवी वय ४ वर्ष व कु.तनवी १ वर्ष ही फुले उमलली पण नियतिला व  कुटुंबीयांच्या  क्रुर स्वभावाला हे पटले  नाही.  पतिसह सासु, सासरे, जेठ, जेठाणी, ननंद, यांचे सततचे टोमणे, तुला  मुलीच होतात तुला मुलगा होत नसल्याच्या अपमान जनक बोलणे तर  पती गजानन सनिसे  कडे नादुरुस्त क्रुझर गाडी असल्याने तिच्या दुरुस्तिसाठी माहेरवरुन ५० हजार रु. आणण्याचा तगादा या त्रासाने ज्योतीने गळफास घेतला.

ज्योतीच्या आत्महत्येची माहिती  माहीती तिच्या कुटुंबियानी न दिल्याने मृतकाचा भाउ सागर मनोहर वानखेडे रा. रोहीणखेड यास हे प्रकरण संशयास्पद वाटु लागले.  माहेरकडील सर्व नातेवाईक मंडळी वाघुड येथे गेले असता त्यांना हा प्रकार आत्महत्या नसुन घातपात असल्याचा संशय आल्याने मृतकाचा भाउ सागर वानखेडे यांनी मलकापुर शहर पो.स्टे ला घटनेची तक्रार दिली.

 तक्रारीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तरीय तपासणी केल्यानंतर  वाघुड येथे पौलीस संरक्षणात अंतिम संस्कार करण्यात आले.  पोलिसांनी  आरोपी पती गजानन सनिसे व राजु सनिसे यांना अटक केली असुन व ५ आरोपी फरार आहेत.