२५ वर्षीय विवाहिता गायब!; शेगाव तालुक्‍यातील घटना

 
File Photo
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्‍यातील शिरसगाव निळे शिवारातील किशोर डाबेराव यांच्या शेतातील मळ्यातून २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली झाली.
तिच्या घरच्यांनी ती हरवल्याची तक्रार शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. सौ. कलित अनिल खरात असे या विवाहितेचे नाव आहे. ती बेपत्ता झाल्याची नोंद आज, १५ नोव्‍हेंबरला झाली आहे.