२४ वर्षीय विवाहित तरुणी बाळासह बेपत्ता!; शेगावमधील घटना

 
file photo
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडलेली २४ वर्षीय विवाहित तरुणी १६ महिन्यांच्या बाळासह बेपत्ता झाली आहे. तिच्या पतीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार केली आहे.

सौ. सारिका राहुल कन्हेरकर (२४, रा. अकोट रोड, शेगाव) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ती १६ महिन्यांचा मुलगा स्वराजसह २९ डिसेंबरला दुपारी १२ वाजता घरातून दर्शनासाठी जाते म्‍हणून घराबाहेर पडली होती. संध्याकाळी पाचपर्यंतही परत न आल्याने तिचे पती राहुल यांनी तिचा शोध सुरू केला. गावात, नातेवाइकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तिचे वर्णन असे ः उंची ५ फूट, रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात गुलाबी साडी, सोबत १६ महिन्यांचा मुलगा. तपास पोहेकाँ श्री. रोहनकार (मो. नं. ९८२३२८१९९९) करत आहेत. कुणाला हे मायलेक आढळले तर श्री. रोहनकार यांच्याशी संपर्क करावा.

खामगाव तालुक्‍यातून तरुण बेपत्ता
जळका भडंग (ता. खामगाव) येथून २३ वर्षीय पुरुषोत्तम लालसिंग सोळंके हा तरुण बेपत्ता झाला आहे. तो हरवल्याची तक्रार त्‍याचे वडील लालसिंग बाबुसिंग सोळंके (६०) यांनी दिली. काल, ३० डिसेंबरच्या सकाळी ११ पासून तो गायब आहे. रंग निमगोरा उंची अंदाजे ५ फूट ७ इंच, बांधा सडपातळ, केस काळे, अंगात जिन्स पँट, पांढरे शर्ट, पायात पांढरा बूट असे त्‍याचे वर्णन आहे. तपास नापोकाँ संदीप सोळंके करत आहेत.

५ दिवसांतील अन्य बेपत्ता
अश्विनी आकाश गुंजकर (२२, रा. तरवाडी शिवार, ता. नांदुरा, पोलीस ठाणे बोराखेडी), हरी निवृत्ती उदयकार (४३, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर, पोलीस ठाणे मलकापूर शहर), सौ. मीना उर्फ पूजा भास्‍कर सोळंके (३०, रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर, पोलीस ठाणे तामगाव), युनूस चौधरी फरीब चौधरी (२५, गवळीपुरा, बुलडाणा, पोलीस ठाणे बुलडाणा शहर), वैभव विनोद मानकर (१८, रा. मोताळा, पोलीस ठाणे बोराखेडी).