२३ वर्षीय तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या

चिखली तालुक्‍यातील घटना
 
 
विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २३ वर्षीय तरुणीने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना चिखली तालुक्यातील बोरगाव वसू शिवारात ८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्‍या सुमारास समोर आली.
सीमा सुरेश माने (रा. बोरगाव वसू) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सकाळी अकराला ती जनावरे आणि बकऱ्या घेऊन शेतात गेली होती. साडेअकराला तिची आईसुद्धा शेतात आली. मात्र सीमा दिसत नसल्याने आईने शोध सुरू केला. शेतातील विहिरीच्या कडेला तिच्या चपला दिसून आल्या. त्‍यामुळे घाबरलेल्या आईने आजूबाजूच्या शेतातील लोकांना बोलावून घेत शोध सुरू केला. ग्रामस्‍थांनी विहिरीत गळ टाकला असता मृतदेह गळात अडकून वर आला. घटनेची माहिती मुलीचे काका प्रकाश नारायण माने यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तिच्या आत्‍महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. व्यवहारे करत आहेत.