शेलगाव आटोळमध्ये २० वर्षीय तरुणी बेपत्ता!; चिखली तालुक्‍यातील घटना

 
missing
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २० वर्षीय तरुणी हरविल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी काल, ३१ डिसेंबर रोजी रात्री अंढेरा पोलीस ठाण्यात दिली आहे. स्वाती उमाजी खरडे (२०, रा. शेलगाव आटोळ, ता. चिखली) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मुलीचे आई- वडील मजुरी करतात. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ डिसेंबरला दुपारी ४ वाजता कुणाला काहीही न सांगता स्वाती घराबाहेर निघून गेली. बराच वेळ परत न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. नातेवाइक, मित्र-मैत्रिणी सर्वांकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने काल ती हरविल्याची तक्रार देण्यात आली. रंग काळासावळा, सडपातळ बांधा, पांढरा टॉप, निळी पँट अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास अंढेरा पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.