२ लाखांचे कर्ज! बुलडाणा तालुक्यातील जामठीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
Thu, 22 Dec 2022

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शेतकऱ्यांची दैन्यावस्था आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याचा आकडा वाढतोय.
बुलडाणा तालुक्यातील ग्राम जामठी येथील शेतकरी कैलास विश्वनाथ तायडे यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना आज, २२ डिसेंबरच्या सकाळी समोर आली.
बुलडाणा तालुक्यातील ग्राम जामठी येथील शेतकरी कैलास विश्वनाथ तायडे यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना आज, २२ डिसेंबरच्या सकाळी समोर आली.
शेतकरी कैलास तायडे यांच्या नावावर शेकापूर शिवारात ३ एकर शेती आहे. त्यांनी एका खाजगी पत संस्थेकडून २ लाखाचे कर्ज घेतले होते. मागील काही दिवसांपासून ते कर्जपायी त्रस्त होते. अशातच त्यांनी टोकाचा निर्णय घेत गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व शवविच्छेदनासाठी धाड ग्रामीण रुग्णालय येथे त्यांचे प्रेत पाठविले. याप्रकरणी धाड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. जामठी परिसरात या शेतकरी आत्महत्या मुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.