कॉलेजला गेलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; खामगाव तालुक्‍यातील घटना

 
missing
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्कॉलरशीपचा फॉर्म भरायला जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली लांजूळ (ता. खामगाव) येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी जलंब पोलीस ठाण्यात आज, ३१ डिसेंबरला सकाळी केली. त्‍यावरून पोलिसांनी नोंद घेऊन तिचा शोध सुरू केला आहे.
कु. प्रांजल प्रमोद जयस्वाल असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. खामगावच्या महिला कॉलेजमध्ये स्कॉलरशीपचा फॉर्म भरायला जातेय, असे सांगून ती काल, ३० डिसेंबरला सकाळी घरातून बाहेर पडली होती. संध्याकाळी सहापर्यंतही ती परतली नाही. त्‍यामुळे आज जलंब पोलिसांत तिच्या वडिलांनी धाव घेऊन तक्रार दिली. रंग गोरा, उंची ५ फूट ३ इंच, अंगात पोपटी पंजाबी ड्रेस, पायात गुलाबी सॅन्डल असे तिचे वर्णन आहे. तपास एएसआय श्री. तिडके करत आहेत.