बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे मेहकरमधून अपहरण!

 
अपहरण

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकरच्या एका शाळेत बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना काल, २ नोव्‍हेंबरला समोर आले. ३० ऑक्‍टोबरपासून मुलगी गायब आहे. बराच शोध घेतल्यानंतर मुलीच्‍या काकाने मेहकर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. 

१७ वर्षे ८ महिने वय असलेली मुलगी तिच्या आईला भेटण्यासाठी व पैसे देण्यासाठी दवाखान्यात गेली होती. आईला भेटली व तिच्या काकूजवळ २० हजार रुपये तिने दिले. त्‍यानंतर शहरातीलच आजीला भेटून परत येते असे म्हणून ती निघून गेली. नेहमी १०-११ वाजता ती मामासोबत घरी यायची. पण त्‍या दिवशी ११ वाजले तरी आली नाही. त्‍यामुळे तिच्या मामाकडे विचारणा केली असता ती त्‍यांच्‍याकडे आलीच नसल्याचे त्‍यांनी सांगितले. नातेवाइक, शाळेतील मैत्रिणींकडे चौकशी करूनही ती मिळून आली नाही. तिला कुणीतरी पळवून नेले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्‍त करण्यात आला आहे.