चिखली शहरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण!

ब्‍युटी पार्लरला गेली परतलीच नाही...
 
खामगाव शहरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; कॉम्‍प्‍युटर क्लासला गेली होती…
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना २० नोव्‍हेंबरला रात्री समोर आली आहे. ब्‍युटी पार्लरला जाते सांगून मुलगी गेली होती. शहरातील काझी मशिदीजवळून ती गायब झाली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

कुंभारवाडी, जुना गाव येथील ४० वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यांची दोन क्रमांकाची १७ वर्षीय मुलगी चिखलीच्या एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकते. अपहरण झालेली मुलगी आजी- आजोबांकडे भोगवती गावाला आई व भावासह आली होती. २० नोव्‍हेंबरला सकाळी ११ ला मुलगी ब्‍युटी पार्लरमध्ये जाऊन येते असे सांगून चुलत बहिणीसोबत स्‍कूटीने चिखलीला निघाली होती. चिखलीच्या काझी मशिदीजवळ तिला सोडून चुलत बहीण ट्युशनला निघून गेली. संध्याकाळी ५ पर्यंत मुलगी परत न आल्याने तिच्या आईला चिंता वाटू लागल्याने त्‍यांनी नातेवाइकांसह शोध सुरू केला. ब्‍युटी पार्लरमध्ये चौकशी केली असता तिथे ती आलीच नसल्याचे सांगण्यात आले. कुणीतरी व्यक्‍तीने तिला फूस लावून पळवल्याचा संशय व्यक्‍त करून तिच्‍या आईने चिखली पोलिसांत तक्रार केली आहे.