जिल्ह्यात १४ दिवसांत १७ जणी गायब! पूजा, मनस्वी, भाग्यश्री, गंगा, पूनम, कल्पना, करिश्मा झाल्या गायब! फोटोत दिसणाऱ्या तुम्हाला दिसल्या तर पोलिसांना सांगा..!!

 
ganga
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून महिला आणि लग्नाळू मुली बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्या कुठे जातात, कुणासोबत जातात याचा थांगपत्ता मात्र लागत नाही. जिल्ह्यात मुलींचे, महिलांचे अपहरण करून त्यांना कुठल्या व्यवसायात तर ढकलल्या जात नाही ना यादृष्टीने देखील तपास होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात चालू महिन्यात आज १४ सप्टेंबर पर्यंत १७ मुली ,महिला बेपत्ता झाल्याचे बुलडाणा लाइव्ह च्या पाहणीत समोर आले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मनस्वी संजय मापारी (१८) ही श्र्वासानंद नगर मेहकर येथून बेपत्ता झाली. सौ.अनिता ज्ञानेश्वर वाघ(३६) ही विवाहिता  मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथून,पूजा विजय सहाने (२४) ही मेहकरच्या चायगाव येथून, भाग्यश्री मोहन सपकाळ(२३) जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथून, गंगा मोहन सपकाळ(२८) हीसुद्धा जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथून  बेपत्ता झाली आहे.

कु पूनम जगन तांबे(१९) ही सैलानी येथून, कल्पना मोहन गायकवाड(२०) बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथून, शेख सबा शेख अन्सार (१९) ही सैलानी येथून बेपत्ता झाली आहे. सौ. अन्नपुर्णा शेषराव मिरगे(५०) ह्या जलंब पोलीस स्टेशन हद्दीतून, माविया इफत अ. करीम (१९) ही खामगाव येथून, सौ .दिपाली मयूर जैन (२५) ही विवाहिता नांदुरा येथून गायब झाल्याची नोंद आहे.

  विद्या काशिराम जाधव(२२) गोडे कॉलेज परिसर बुलडाणा येथून, करीश्मा भावसिंग डावर (२०) जळगाव जामोद तालुक्यातील हणवतखेड येथून, सलमा बी. अमीर शहा(२७) ही मोताळ्यातून गायब झाली. निर्मला शहादेव येनकर (७५) ह्या आजी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथून बेपत्ता झाल्या आहेत. सत्यशीला मनोहर भोजने(१८) ही शेगाव तालुक्यातील तींत्रव येथून तर सादिका बी.शेख चाँद(३५) ह्या खामगवच्या मेहबूब नगरातून गायब आहेत.