पुरात वाहून गेल्याने १३ वर्षीय जयचा मृत्यू! खामगाव तालुक्यातील ढोरपगावची घटना..

 
fghj

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) रानात गाय पाहण्यासाठी गेलेला तेरा वर्षीय मुलगा नदीपात्रात बुडून मरण पावल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे उघडकीस आली आहे.

jfjfj

              जाहिरात

जय विठ्ठल तायडे (वय वर्ष - १३ रा.ढोरपगाव ता - खामगाव) असे नदीपात्रात बुडून मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. जय हा १२ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान शेतात गाय पाहण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी परातलाच नाही.शेवटी जय च्या घरातील मंडळींनी, गावकऱ्यांनी त्याचा रात्रभर सर्वत्र शोध घेतला.तरीही जय मिळून आला नाही. आज १३ जुलै च्या सकाळी ६ वाजताच्या दरम्यान भालेगाव (बाजार) ता - खामगाव येथील सिद्धगंगा नदीपात्रात जयचा मृतदेह मिळून आला आहे.नदीला पूर आल्यामुळे जय त्यामध्ये वाहून गेला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भिकाजी काशीराम तायडे (वय वर्ष - ५० रा - ढोरपगाव ता - खामगाव) यांनी तशी तक्रार पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.पुढील तपास पोहेकॉ अनिल इंगळे करीत आहेत.